अक्कलकोट

केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात कॉंग्रेस पक्षाच्या वतीने बैलगाडी व ट्रॅक्‍टर मोर्चा

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) –
केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात कॉंग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी २ नोव्हेंबर दुपारी १ वाजता बैलगाडी व ट्रॅक्‍टर मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत काढण्यात येणार असल्याची माहिती माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी दिली. 

अक्कलकोट येथील प्रमिला पार्क काँग्रेस कार्यालयात शुक्रवारी दुपारी बैलगाडी व ट्रॅक्‍टर मोर्चाच्या नियोजनासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे बोलत होते.
या वेळी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी, जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील, विलासराव गव्हाणे, मल्लिकार्जुन काटगाव, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष भीमा कापसे, युवक अध्यक्ष बाबा पाटील, मुबारक कोरबू, महिला आघाडीच्या मंगल पाटील, राजा जाधव, सातलिंग शटगार, धानेश अचलेर, विश्वनाथ हडलगी, वागदरीचे सुधीर सोनकवडे, सायबू गायकवाड, माजी नगरसेवक रामचंद्र समाने, शिवशरण इचगे, शशी बकरे, पंचायत समिती सभापती सुनंदा गायकवाड, उपसभापती प्रकाश हिप्परगी, वकील बागवान, शिव स्वामी, राजकुमार लकाबशेट्टी, जहॉंगीर शेख, काशिनाथ बणजगोळ, सिद्धाराम भंडारकवठे, शाकीर पटेल, पांडुरंग चव्हाण आदी उपस्थित होते. 

हा मोर्चा फत्तेसिंह क्रीडांगणापासून प्रारंभ होणार असून एवन चौक, बसस्थानक, विजय कामगार चौक, कारंजा चौक, मेन रोड मार्गे फत्तेसिंह चौक, जुना तहसील कार्यालय मार्गे कॉंग्रेस भवन येथे समारोप होणार आहे. जुन्या तहसील कार्यालय येथे मान्यवरांच्या हस्ते तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. २ नोहेंबरच्या मोर्चा आंदोलनास अक्कलकोट शहर व तालुक्यातील व्यापारी , शेतकरी कामगार यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहान यावेळी माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले दिलीप बिराजदार यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले. मुबारक कोरबू यांनी आभार मानले. 

Related posts