पंढरपूर

ब्रेकिंग न्यूज़ पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दर्शनासाठी पंचवीस दिवस बंद

सचिन झाडे

राज्य शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर व मंदिर समितीच्या अधिपत्याखालील पंढरपूर शहर परिसरातील २८ परिवार देवतांची मंदिरे सोमवार दि. ५ एप्रिल ते ३० एप्रिल अखेर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येत आहेत. तथापि विठ्ठल रुक्मिणीचे सर्व परंपरेनुसार सुरू राहतील. इतर सण व उत्सव परंपरेनुसार साध्या पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.

पंढरपूर : सध्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, दि. ५ एप्रिल पासून दि. ३० एप्रिल पर्यंत विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येत आहे.
मात्र श्रींचे सर्व नित्योपचार परंपरेनुसार सुरू राहतील. त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी पंढरपूर मध्ये येऊ नये, याबाबतचे पत्र विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने दिले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता दि.१७ मार्च २० ते दि.१४ नोव्हेंबर या कालावधीत भाविकांना विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर राज्य शासनाच्या आदेशानुसार १५ नोव्हेंबर २० पासून भाविकांना श्री चे फक्त मुखदर्शन उपलब्ध करून देण्यात आले होते. महाराष्ट्र शासन महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग मंत्रालय मुंबई यांच्या आदेशानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
यामध्ये सर्व धार्मिक व प्रार्थनास्थळे सोमवार दि. ५ एप्रिल रात्री आठ ते शुक्रवार दि. ३० एप्रील २१ अखेर रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्याबाबत नमूद केले आहे. राज्य शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर व मंदिर समितीच्या अधिपत्याखालील पंढरपूर शहर परिसरातील २८ परिवार देवतांची मंदिरे सोमवार दि. ५ एप्रिल ते ३० एप्रिल अखेर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येत आहेत. तथापि विठ्ठल रुक्मिणीचे सर्व परंपरेनुसार सुरू राहतील. इतर सण व उत्सव परंपरेनुसार साध्या पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.
त्या बाबतचे पत्रक सदस्य आ. रामचंद्र कदम, श्रीमती शकुंतला नडगिरे, डॉ. जयेशकुमार कदम, हभप भास्करगिरी गुरु किसनगिरी बाबा, संभाजी शिंदे, सुजित सिंह ठाकुर, हभप ज्ञानेश्वर महाराज देशमुख, एड. माधवी निगडे, सौ साधना भोसले यांनी विचारविनिमय करून एकमताने निर्णय घेऊन कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

Related posts