पंढरपूर

बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आटा चक्कीचे बुकिंग सुरू

आटा चक्की निम्म्या किंमतीत वाटप

सचिन झाडे (प्रतिनिधी)

पंढरपूर – बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने तसेच माऊली हळणवर यांच्या माध्यमातून आज सामाजिक उपक्रमाची सुरुवात पंढरपुर येथे करण्यात आली.यामध्ये गोरगरीब व गरजू महिलांना 50% किमतीत आटाचक्की वाटप करण्याचा मानस संघटनेचा होता त्याची सुरुवात गुरुवारी पंढरपूर येथील नविन कराड नाका येथे बुकिंग दुकानाचे उद्घाटन करून करण्यात आले.

या दुकानाचे उद्घाटन पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
सर्वसामान्याला परवडावे म्हणून निम्म्या किमतीमध्ये पिठाची गिरणीचे बुकिंग सुरू असून 7249125827/7249125811 या नंबर वरती बुकिंग करून जास्तीत जास्त कर्ज महिलांनी आटा चक्की चे बुकिंग करावी असे आव्हान बळीराजा शेतकरी संघटनेचे माऊली हळणवर यांनी केले

यावेळी नागेश,भोसले नगरसेवक डि राज सर्वगोड हरिभाऊ गावधरे, भाई किशोर भोसले ,काकासाहेब बुरांडे ,उत्तम बाबा चव्हाण, राजेंद्र बुद्याळ, बबनराव येळे, संजय माने ,कविता राजमाने,दूधभाते, छाया आगलावे,नितीन काळे अण्णा सलगर प्रशांत घोडके हनुमंत शेंडगे दादासो कोळेकर तसेच शिवरत्न इलेक्ट्रॉनिक्स अँड हार्डवेअरचे केतन घुले, आशिष कोकरे ,संतोष भिसे, प्रमोद घुले, सुरज भोसले, दादा ठोंबरे,
यांचेसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts