पंढरपूर

पंढरपूर नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे पगार न झाल्याने शासनाकडून वेतन अनुदान मिळणे साठी बोंबाबोंब आंदोलन.

पंढरपूर –
पंढरपूर नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे पगार न झाल्याने नगर परिषदेसमोर कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव आदापुरे राज्याचे सरचिटणीस सुनील वाळुजकर कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे सह कार्याध्यक्ष शरद वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्रातील सर्व नगर परिषदांना कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर व्हावी या हेतूने शासनाने कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सहाय्यक वेतन अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला सर्व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच नगर परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन होणे आवश्यक आहे. परंतु शासनाकडून वेतनासाठी मिळणारी सहाय्यक अनुदानाची रक्कम वेळेवर न मिळाल्याने डिसेंबर महिन्यांमध्ये अद्याप पर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाहीत सध्या कोरोनाच्या काळात हेच सर्व नगरपरिषद कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून गेल्या सात आठ महिन्यापासून काम करीत आहेत परंतु शासनाकडून गेल्या दोन वर्षापासून सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम प्रत्येक महिन्याच्या वीस तारखे नंतर दिली जाते त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार हा 23 24 तारखेला होतो परंतु चालू डिसेंबर महिन्यामध्ये आज 29 तारीख होऊन गेली तरी सुद्धा शासनाकडून अद्याप पर्यंत सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषदाना दिली गेली नाही.त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नगर परिषद कर्मचारी वेतनापासून वंचित राहिला आहे .त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला सहाय्यक वेतन अनुदान मिळावे म्हणून, शासनाचे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी व डिसेंबर महिन्याचे सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम मिळावी यासाठी पंढरपूर नगरपरिषद कर्मचारी संघटना चे वतीने नगर परिषदेसमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष महादेव अदापुरे सरचिटणीस सुनील वाळुजकर, कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे,सह कार्याध्यक्ष शरद वाघमारे उपाध्यक्ष जयंत पवार, अनिल गोयल, संतोष सर्वगोड,नागनाथ तोडकर, किशोर खिलारे, गुरु दोडिया धनजी वाघमारे, प्रितम येळे यांच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्ष सौ साधनाताई नागेश भोसले मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर व पक्ष नेते गुरुदास अभ्यंकर यांना मागण्याचे निवेदन दिले.

तसेच येत्या 4 जानेवारी 2021 पर्यंत सहाय्यक वेतन अनुदान ची रक्कम नगर परिषदांना मिळाली नाही तर 5 जानेवारीपासून महाराष्ट्रातील सर्व नगरपालिका बेमुदत कामबंद आंदोलन करतील. होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील,असा इशारा कामगार संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.

Related posts