अक्कलकोट

जयहिंद शुगर्सचा बाॅयलर अग्निप्रदीपन सोहळा संपन्न.

अक्कलकोट ( मागील वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने जयहिंद कारखान्यास ऊस पुरवठा केला. दोन, महिन्याखाली सर्वांची देणी पूर्ण केली. यापुढेही शेतकऱ्यांच्या हितासाठीच प्रयत्न असेल, अशी ग्वाही जयहिंद शुगर्सचे चेअरमन गणेश माने देशमुख यांनी दिली. आचेगांव (ता. दक्षिण सोलापूर) येथील जय हिंद शुगर्सच्या बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे मार्गदर्शक बब्रुवान माने देशमुख हे होते.

व्यासपीठावर शालिवहन माने देशमुख, बाळासाहेब माने देशमुख, प्रकाश माने देशमुख, जयवर्धन गणेश माने देशमुख, व्हाईस चेअरमन विक्रमसिंह पाटील, विजय पाटील, कार्यकारी संचालक मोहन पिसे, शेतकी अधिकारी राजेंद्र जेऊरे, मोहन चिंतलवार, रविप्रकाश मेंगर, आर.गोकुळ, आदी उपस्थित होते.

गणपती यादवाड, गुरंशांतप्पा कुडल, मल्लिकार्जून गिरमल, संगप्पा पिशानतीट, बाबासाहेब पाटील, संगमेश्वर पाटील, सिद्धाराम कुडल, चन्नप्पा बगले, शंकर पाटील, सुलतान शेख, प्रभुलिंग सर्वगौड, सचिन गुंड, इरण्णा चिक्कळी, सिध्दाराम झळकी आदी शेतकऱ्यांच्या हस्ते पुजा संपन्न झाली.

प्रारंभी होमहवन व सत्यनारायणाची पुजा संपन्न झाली. यानंतर बाॅयलर अग्नीप्रदीपनाचा कार्यक्रम पार पडला. पुढे बोलताना गणेश माने देशमुख म्हणाले की, जयहिंद शुगर्सने नेहमीच शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. दुष्काळ निवारणासाठी जलसंधारणाची कामे, कारखाना स्थळावर गोशाळेची निर्मीतीसोबतच कारखाना आपल्या दारी या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ऊसाच्या बिलाचे वाटप असे अनेक उपक्रम यापूर्वी राबविले आहेत. मागील वर्षातील सर्व देणी या हंगामापूर्वी पूर्ण झाली आहेत. येत्या हंगामासाठी जयहिंद परिवार पूर्ण क्षमतेने सज्ज आहे. आजवर ऊस उत्पादकांनी जयहिंद परिवाराला सहकार्य केले आहे. यापुढे देखील अशाच सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. वेदोपचार वेदमुर्ती बसवराज शास्त्री हिरेमठ यांनी केले.

Related posts