दक्षिण सोलापूर

मंद्रुप पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबीर संपन्न.

मंद्रुप पोलिस ठाण्याचे कार्य कौतुकास्पद -पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते

५० रक्तदातेंनी केले श्रेष्ठदान

अशोक सोनकंटले – विशेष प्रतिनिधी दक्षिण सोलापूर

सध्या देशभरात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने हाहाकार माजवले असताना अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना ऑक्सिजन व बेड उपलब्ध होताना दिसत नाही. याच बरोबर दिड वर्षापासून देशात महामारी असल्याने थोर संत,स्वातंत्र्य सैनिक, यांची जयंती किंवा वाढदिवसानिमित्त ठेवल्या जाणाऱ्या कार्यक्रमात रक्तदान शिबीर घेतले जायचे. पण हे सर्व कार्यक्रम सध्या साध्या पद्धतीने करत असल्याने देशभरातच रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनेही रक्तदान करण्याचे आवाहन केले होते.व आज महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून मंद्रुप पोलीस ठाणेच्या वतीने डॉ. हेडगेवार रक्तपेढी यांच्या आवाहानास प्रतिसाद देत रक्तदान शिबीर घेण्यात आले.

यावेळी या कार्यक्रमाचे उदघाटन पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते झाले. त्यांच्या समवेत यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे व मंद्रुपचे प्रथम नागरिक सरपंच कलावती खंदारे ,आनंद देशमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना सातपुते म्हणाले कि ,सद्या कोरोना महामारीमध्ये नागरिक घराच्या बाहेर पडण्यासाठी घाबरत आहेत. लसीकरण चालू आहे. आणि तसल्यातच महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा निर्माण झाले असताना मंद्रुप पोलीस ठाणेच्यावतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून घेतलेल्या रक्तदान शिबीराबद्दल कौतुक केले.त्या पुढे म्हणाल्या कि, सर्वांनी मास्क, सँनिटायझर ,व योग्य अंतर ठेवण्यासाठी आवाहन केले.

रक्तदान शिबीराच्या उदघाटन नंतर मंद्रुप पोलीस ठाणे परिसरात सेल्फी पॉईंटचेही उदघाटन करून पाहणी करण्यात आले. मंद्रूप पोलीस ठाणे मार्फत आयोजित रक्तदान शिबिरास उपस्थित राहिलेले सर्व रक्तदाते त्यामध्ये पोलीस अंमलदार, पोलीस पाटील, पोलीस मित्र, पत्रकार मित्र, सामाजिक कार्यकर्ते, तसेच नागरिक यांचे मंद्रूप पोलीस ठाणेच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करण्यात आले.

Related posts