उस्मानाबाद 

ईद – ए – मिलाद सणाच्या निमित्ताने रक्तदान व कोविड लसीकरण शिबीर संपन्न.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा.

उस्मानाबाद – उस्मानाबाद शहरामध्ये एकात्मता आणि बंधुता निर्माण करणाऱ्या ईद-ए-मिलाद सणाचे औचित्य साधून गाजी ग्रुप व कुरेशी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने उस्मानाबाद शहरातील नेहरू चौक,दर्गा रोड आणि माळी गल्ली येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे व कोविड लसीकरण शिबिराचे उदघाटन आ कैलास पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

कोरोना महामारीच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला सक्षमपणे रोखण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन यावेळी आ. कैलास पाटील यांनी केले. तसेच रक्ताचा तुटवडा भासत असताना रक्तदान करण्यासाठी आलेल्या रक्तदात्यांशी संवाद साधत त्यांचे आभार मानले. लोकहिताचा स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल आयोजक व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आ. कैलास पाटील यांनी अभिनंदन केले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदूभैय्या राजेनिंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय मामा निंबाळकर, डॉ.प्रतापसिंह पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील-दुधगावकर, काँगेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, राजाभाऊ शेरखाने, शिवसेना शहरप्रमुख संजय मुंडे, माजी शहरप्रमुख प्रविण कोकाटे, नगरपालिका गटनेते सोमनाथ गुरव, पंकज पाटील, नगरसेवक खलिफा कुरेशी, बाबा मुजावर, अग्निवेश शिंदे, अफरोज पिरजादे, साबेर शेख, कलीम कुरेशी, छोटा साजिद, शहबाज पठाण, साजिद पठाण, जावेद शेख तसेच आरोग्य विभागाचे डॉक्टर, परिचारिका व तंत्रद्य उपस्थित होते.

Related posts