महाराष्ट्र

भ्रष्टाचाराचा आरोप करून राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजप ने सोबती केलं?

मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे आरोप केलेले बहुसंख्य नेते एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून भाजपबरोबर आल्याने सोमय्या यांची पंचाईत झाली आहे. या नेत्यांबाबत सोमय्या कोणती भूमिका घेणार याची उत्सुकता असेल.
सोमय्या यांनी अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ , हसन मुश्रीफ आधी नेत्यांविरोधात सिंचन गैरव्यवहार, राज्य सहकारी बँक, साखर कारखान्यातील गैरव्यवहार गेली अनेक वर्षे जोरदार आघाडी उघडली होती. अंमलबजावणी संचालनालय, प्राप्तीकर विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. सिंचन गैरव्यवहार प्रकरणी काही अधिकारी आणि अजित पवारांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ईडीने अजित पवार यांच्या नातेवाईकांकडेही छापे टाकून चौकशी केली आहे. मंत्री हसन मुश्रीफ, खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह काही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांविरोधातही सोमय्या यांनी मोहीम चालविली. मुश्रीफ यांच्याबरोबर चांगलीच जुंपली होती आणि सोमय्या यांना पोलिसांनी कोल्हापूरला जाण्यापासून मुंबईतच रोखले होते.
मुश्रीफांची ईडी कारवाईतून सुटका ?
ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाकडून त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. मुश्रीफ आणि त्यांच्या तीन मुलांची सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना आणि अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना कर्जपुरवठा प्रकरणात चौकशी सुरु आहे. ईडीकडून मुश्रीफांविरोधात ३५ कोटी रुपयांचा आर्थिक अफरातफरीचा (मनी लाँड्रिंग) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर ईडीकडून तीन वेळा छापे टाकण्यात आले आहेत. मुश्रीफ यांच्या त्यांच्या तिन्ही मुलांमागेही ईडीचा ससेमिरा सुरु आहे. मुश्रीफांविरोधात कोल्हापूर आणि मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या कोल्हापूरमध्ये त्यांच्या विरोधात १०८ तक्रारी दाखल झाल्या असून या प्रकरणांचा तपास कोल्हापूर पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण शाखेकडून करण्यात येत आहे.

सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे हे नेते आता भाजपबरोबर सरकारमध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधातील कायदेशीर कारवाई आता थंडावण्याची शक्यता आहे.

शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक, यामिनी व यशवंत जाधव आदींविरोधातही सोमय्या यांनी आघाडी उघडली होती. सरनाईक यांची अनधिकृत बांधकामे तर जाधव यांचे स्थायी समितीतील गैरव्यवहार यावर सोमय्या यांनी टीकेची झोड उठविली होती. शिंदे गटातील हे नेते भाजपबरोबर आल्यावर सोमय्यांची तोफ थंडावली, तेच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबाबतही होणार आहे.

भाजपबरोबर आल्यावर सरनाईक, जाधव व अन्य नेत्यांच्या विरोधातल सोमय्या यांची आरोपबाजी बंद झाली होती. आता अजित पवार, तटकरे, भुजबळ, मुश्रीफ यांच्याबाबत सोमय्या आवाज उठविणार का, असा प्रश्न केला जात आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांआधी कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडी तोडणे-फोडणे केंद्रातील सत्ताधारी भाजपसाठी अत्यावश्यक होते. अजित पवार आणि मंडळींच्या फुटीने भाजपची ती मनीषा रविवारी पूर्ण झाली. गेल्या वर्षी ३० जूनला एकनाथ शिंदे आणि भाजप यांचे सरकार सत्तेवर आले. त्या वेळी शिंदे आणि मंडळींकडून भाजपस फार आशा होती. पण झाले उलटेच. शिंदे आणि विशेषत: त्यांचे सहकारी भाजपसाठी डोकेदुखी नसेल; पण डोक्यावरील ओझे मात्र निश्चितच ठरले. या असल्या साथीदारांस घेऊन आगामी निवडणुकांस सामोरे गेलो तर हाती काहीही लागणार नाही, याचा अंदाज भाजपस आला. त्या पक्षाच्या विविध पाहण्यांतून समोर आलेले निष्कर्षही हेच सूचित करीत होते. तेव्हा निवडणुकांआधी आणखी काही बेरजेचे राजकारण करण्याची गरज भाजपस होती. त्यासाठी दोन पर्याय होते. एक राज ठाकरे यांचा ‘मनसे’ आणि दुसरा अजितदादा आणि जमेल तितके राष्ट्रवादी. त्यामुळे भाजप दोन्ही आघाडय़ांवर खेळत होता. त्यातील अजितदादांचा पर्याय लवकर फळला. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी रविवारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री-पदाची शपथ घेतली. यावरून राज्यातील कार्यकर्ते संभ्रमात आहे. काकांकडे जावे की पुतण्याकडे जावे असा संभ्रम त्यांच्यापुढे आहे. ऐनवेळी शपथविधीची माहिती मिळाल्यामुळे समर्थनाच्या पत्रावर सही केल्याची माहिती आमदारांनी दिली आहे. मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून नेमकं कोणाच्या बाजूनं आपण उभं राहायचं हे ठरवणार असल्याचे कार्यकर्ते म्हणाले.
अजित पवारांसह नऊ मंत्र्यांच्या शपथविधीचे साक्षीदार असणारे जुन्नरचे आमदार अतुल बेनके संभ्रमात पडलेत. बेनके यांना अजित पवारांनी फोन करून मुंबईत बोलावून घेतलं, आधीपासून त्यांना असं काही घडेल याची कुणकुण होतीच. पण काल मात्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी बैठक बोलावली असेल, असा त्यांचा ग्रह होता. मात्र थेट शपथविधी पार पडला. त्यानंतर काही वेळातच थेट शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे बेनके यांना फोन आल्यानं त्यांची गोची झाली आहे. त्यामुळं शरद पवार की अजित पवार अशी स्पष्ट भूमिका घेणं त्यांनी तूर्तास टाळलं आहे. मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून नेमकं कोणाच्या बाजूनं आपण उभं राहायचं, हे आम्ही ठरवू,असा पवित्रा शपथविधी सोहळ्यात उपस्थित असणाऱ्या बेनके यांनी घेतलाय. काका-पुतण्यांनी एकत्र राहावं अशी माझी वैयक्तिक भूमिका आहे. पुढील तीन-चार दिवसांत नेमकं काय घडतं, हे पाहून आणि माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करून मी माध्यमांशी बोलेल असे बेनके म्हणाले.

काका की पुतण्या?
अतुल बेनके यांचे वडील माजी आमदार वल्लभ बेनके हे शरद पवारांचे कट्टर समर्थक मानले जातात. तर अतुल बेनके हे शरद पवार आणि अजित पवार या दोघांशी जुळवून घेत आलेत. त्यामुळेचं सद्यपरिस्थितीत बेनके यांच्या समोर नेमकं कोणाच्या बाजूनं उभं राहायचं हा पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी भाजपला पाठिंबा देण्याच्या दिला आहे.मात्र मतदारसंघातील कार्यकर्ते शरद पवार यांच्यासोबत असल्याचे संदेश येत आहेत. त्यामुळे काका की पुतण्या हा संभ्रम कायम असल्याचे दिसून आले.

अजित पवारांच्या निवासस्थानी बैठक
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या देवगिरी निवासस्थानी बैठक बोलावली आहे. या बैठकीला काल शपथ घेतलेले मंत्री आणि ज्यांनी सह्या केल्या नाहीत त्याच आमदारांना आणि खासदारांना बोलावण्यात आलं आहे. आतापर्यंत देवगिरी या निवासस्थानी दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ,संजय बनसोडे, छगन भुजबळ, राम राजे निंबाळकर, सुनील तटकरे हे उपस्थित आहेत. या बैठकीत मागील बंडाप्रमाणे हे फसू नये म्हणून या आमदारांना विश्वासात घेतलं जाणार आहे. या बैठकीत आपली पुढची भूमिका काय याविषयी अजित पवार मार्गदर्शन करतील

Related posts