उस्मानाबाद  तुळजापूर

ढेकरी येथे शालेय साहित्य वाटप करून पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि खा. ओमराजेंचा वाढदिवस साजरा.

युवा उद्योजक तथा शिवसैनिक समाधान ढवळे यांचा स्तुत्य सामाजिक उपक्रम.

तुळजापूर – ढेकरी ता.तुळजापूर येथे आज शिवसेना पक्षप्रमुख तथा कुटुंबप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे व धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्री ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिक तथा युवा उद्योजक श्री.समाधान ढवळे यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकरी, ता. तुळजापूर येथील विदयार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

या पुढील काळात देखील शिवसेना पक्षाच्या माध्यमातून अशाच प्रकारचे समाज उपयोगी कार्यक्रम घेऊ. यामध्ये बालआरोग्य शिबीर असेल, विदयार्थ्यांना वेगवेगळ्या शिष्यवृत्ती यांची माहिती असेल, योगशिबिर असेल किंवा शासकीय योजनांची माहिती असेल या सर्व कामांच्या संदर्भातील शिबिरे आपण निश्चितपणे आयोजित करू अशी ग्वाही यावेळी शिवसैनिक समाधान ढवळे यांनी बोलताना दिली.

“घडी गेली की, पीढी जाते” त्यामुळे कसलीही समस्या असेल तर आमच्यापर्यंत येऊ द्या, मी खात्री देतो या सर्व शाळकरी मुलांसाठी मी २४ तास उपलब्ध असेल असे जाहिर आश्वासन यावेळी शिवसेना (UBT) पक्षाचे नुतन सहसंपर्कप्रमुख श्री. नंदुभैय्या राजेनिंबाळकर यांनी यावेळी बोलताना दिले.

श्री. समाधान ढवळे यांनी फाजील खर्चाला फाटा देत आयोजित केलेल्या या सामाजिक उपक्रमबद्दल त्याने कौतुकास्पद अभिनंदन करून अशा प्रकारची सामाजिक कामे आपल्या वरिष्ठ नेते मंडळींच्या साहाय्याने तालुकास्तरावर राबवून तालुक्यात पक्ष मजबूत करू असे जाहिर आवाहन यावेळी तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी यांनी सर्व बांधवांना बोलताना केले.

नुतन नियुक्ती झाल्याबद्दल समाधान ढवळे व मित्र परिवाराच्या वतीने मा. नंदुभैय्या राजेनिंबाळकर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी शिवसेना (UBT) चे सहसंपर्कप्रमुख श्री. नंदुभैय्या राजेनिंबाळकर, तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, उप तालुकाप्रमुख सरदार ठाकूर व प्रदीप मगर, ढेकरी गावचे युवा सरपंच तेजस माने, विभाग प्रमुख बालाजी पांचाळ, येवती गावचे सरपंच अमोल गवळी, सामाजिक कार्यकर्ते गुणवंत देशमुख, युवा सामाजिक कार्यकर्ते समाधान ढवळे, बालाजी शेंडगे शाळेचे मुख्याध्यापक श्री कुलकर्णी सर, सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते…!

Related posts