दक्षिण सोलापूर

माजी विद्यार्थी महाविद्यालयाचे भूषण : प्राचार्य डॉ. बी.एम.भांजे

अशोक सोनकंटले
दक्षिण सोलापूर विशेष प्रतिनिधी

मंद्रुप येथील संतोष भीमराव पाटील महाविद्यालयात शिकलेले व समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात प्रतिनिधित्व करीत असलेले माजी विद्यार्थी हे महाविद्यालयाचे भूषण असल्याचे प्रतिपादन संतोष भीमराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . बी. एम.भांजे यांनी केले . ते मंद्रूप येथील संतोष भीमराव पाटील महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याप्रसंगी बोलत होते . यावेळी माजी विद्यार्थी संघटनेचे समन्वयक डॉ. दीपक देडे , संघटनेचे अध्यक्ष अमोगसिद्ध मुंजे , उपाध्यक्ष पंचाक्षरी स्वामी , सचिव अॅड. मंजुनाथ कक्कळमेली , सदस्य दयानंद ख्याडे , ओंकार झेंडेकर , विश्वनाथ घाटे , विकास शिळ्ळे व माजी सरपंच विश्वनाथ हिरेमठ आदी उपस्थित होते .

प्रारंभी माजी सभापती गोपाळराव कोरे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली .

यावेळी बोलताना डॉ.भांजे पुढे म्हणाले की , मंद्रूप येथील महाविद्यालयाने वीस वर्षात मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे . या कालावधीत या महाविद्यालयातून शिकून गेलेले अनेक विद्यार्थी समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात आदर्शवत व चांगल्याप्रमाणे नेतृृत्व करीत आहेत . समाजातील या माजी विद्यार्थ्यांचे कार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे . या महाविद्यालयात नैतिक शिक्षणाबरोबर शिस्तप्रिय शिक्षणाला महत्त्व दिल्यामुळेच आज माजी विद्यार्थ्यांचा अनेक ठिकाणी गुणगौरव होताना दिसून येत आहे . हि महाविद्यालयासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे . वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करीत असताना माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या विकासासाठी हातभार लावण्याचे आवाहन डॉ. भांजे यांनी केले. यावेळी मंजुनाथ कक्कळमेली,अमोगसिध्द मुंजे,विश्वनाथ हिरेमठ ,ओंकार झेंडेकर,दयानंद ख्याडे , म्हाळाप्पा वडरे, इलियास शेख,विश्वनाथ घाटे,आदींनी महाविद्यालयाच्या शिस्तप्रिय शिक्षणाबरोबर शैक्षणिक क्षेत्रातील विकासाचेही कौतुक केले.प्रास्ताविक पंचाक्षरी स्वामी यांनी केले,

सुत्रसंचालन विकास शिळ्ळे यांनी तर आभार विश्वनाथ घाटे यांनी मानले.यावेळी महाविद्यालयातील डॉ. सी.एस.मुलगे,प्रा.एम.पी. कसबे, डॉ. शिवानंद तोरवी,प्रा. जवाहर मोरे, प्रा.श्रीमती बी.एस.कोरे, प्रा.रवींद्र डांगे , ए.बी.कोरे,जी.डी. जालवादी, नागेश हाणमगाव,मल्लू नंदुरे,वसंत कांबळे व हनुमंत टारफे आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Related posts