तुळजापूर

ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात बहुजन रयत परिषदेची बैठक संपन्न ; विविध विषयांवर करण्यात आली चर्चा.

• तुळजापूर – प्रतिक भोसले

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सुरू होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुक संदर्भात बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे हे जिल्ह्यामध्ये गावोगावी दौरा करून निवडणुकी संदर्भात लोकांच्या. गाठीभेटी घेऊन ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये यशस्वीरित्या यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत तसेच बहुजन रयत परिषद या संघटनेच्या वतीने मदत करून चांगल्या मताने

निवडून आणून आदर्श ग्रामपंचायत करण्यासाठी सहकार्य करू आपणास ग्रामपंचायत निवडणूकीत बहुजन रयत परिषद या संघटनेचा आपल्याला पाठिंबा राहील असे ते तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले. बहुजन रयत परिषदेच्या सर्व जुन्या-नव्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी संघटना वाढीसाठी, संघटना बळकट करण्यासाठी तसेच संघटनेचे कार्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे असे सुध्दा ते म्हणाले

Related posts