दक्षिण सोलापूर

औराद ग्रामीण बॅंकेचे शाखाधिकारी विश्वनाथ आमणे यांचा उत्कृष्ट सेवेबद्दल हत्तरसंग ग्रामस्थांकडून सत्कार.

अशोक सोनकंटले
विशेष प्रतिनिधी दक्षिण सोलापूर

एक कर्तव्यदक्ष बँक अधिकारी म्हणून दक्षिण तालुक्यातील औराद येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक विश्वनाथ आमणे यांनी सलग चार वर्षे उत्कृष्ट सेवा बजावले असून शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यत पोहोचवल्याबद्द्ल त्याचे हत्तरसंग ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला.

यावेळी सेवेत पारमार्थ पाहणाऱ्या विश्वनाथ आमणे यांनी एक लोकप्रिय अधिकारी म्हणून उत्कृष्ट सेवा बजावून सर्वसामान्यांना नागरिकांना दिलासा दिला. तसेच परिसरातील लोकांसाठी बँकेच्या विविध योजना पोहोचून बँकेचे नावलौकिक केले असून प्रत्येक ग्राहकांच्या अडीअडचणी समजून घेऊन ते आपल्या पद्धतीने सहकार्य केले आहे. बँक म्हणजे एक कुटुंब आहे त्याप्रमाणे त्यानी लोकांना सहकार्य केले आहे.. आणि कर्ज वाटप आणि वसुली मध्ये सुद्दा औराद शाखा अग्रस्थानी आहे.

या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी विलास बिराजदार,शेट्यप्पा बिराजदार,पत्रकार अशोक सोनकंटले,शरणप्पा सुतार,बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक राजकुमार गोरे, बँकेचे रोखपाल बालाप्रसाद शर्मा, बँकेचे अमिन आत्तार , सिध्दू सलगरे, सिध्दाराम कांबळे, आदी उपस्थित होते.

Related posts