23.4 C
Solapur
September 10, 2024
Blog

शिक्षणाची अनास्था;एक चिंतन

शिक्षणाची अनास्था;एक चिंतन

(कशाला पैदा करता मुलं)

कोरोना व्हायरस आला व प्रत्यक्ष शाळा सुरु होण्यावर बंधन आलं.मग काय मुलांचं शिक्षणाचं नुकसान होवू नये म्हणून मोबाईल शिक्षण आलं.मुलांना पालकांनी मोबाइल घेवून दिला.त्या माध्यमातून मुले अभ्यास करु लागली.
काही मुले अभ्यास करु लागली.पण काही मुले स्मार्टफोन असूनही उनाडक्या करीत फिरु लागली.त्यांना त्याचबरोबर शिक्षणाबद्दल अनास्था वाटू लागली.त्याचं कारण म्हणजे पालकवर्ग.

काही काही पालकवर्ग चांगला होता.त्यांनी आपल्या मुलांना स्मार्टफोन घेवून दिले.त्यांनी अभ्यासही घेतला.पण काही काही पालकांकडे स्मार्टफोन होता.परंतू त्यांनी मुलांचा अभ्यास घेतला नाही.याचं कारण होतं शिक्षणाबद्दल त्यांच्या मनात असलेली अनास्था.
पालकांनी मुलं पैदा तर केली.परंतू ती शिकलीच पाहिजे असं त्यांना वाटत नाही.असं प्रत्यक्षदर्शी काम करतांना जाणवलं.त्यातच कारणांचा शोध घेतला.ती कारणं अशी आहेत.
१) मायबाप जास्त शिकलेले नाही.
मायबाप हे बहुतेक घरातील जास्त शिकलेले नाहीत असं आढळतं.त्यामुळं त्यांना साहजिकच शिक्षणाबद्दल कळवळा दिसत नाही.
२) पालक व्यसनाधीन आहेत.
पालक व्यसनाधीन आढळले.त्यांना नशेशी घेणंदेणं आहे.पण शिक्षणाशी लेनदेन नाही.दिवसभर नशेत राहणे व सायंकाळी बायकोच्या भरवशावर खाणे हे त्यांना चांगलं जमतांना आढळलं.
३)नोकरी लागत नाही हा उद्देश मनात आहे.
शिक्षणाबद्दल अनास्था निर्माण होण्याला कारणीभूत आहे नोकरी न लागण्याचा उद्देश.काही आजुबाजूची मुले शिकलेली आहेत.पण त्यांना अद्याप नोकरी लागलेली नसल्यानं ते रिक्षावाहक बनले आहेत.तसेच इतर तत्सम लघू दर्जाचे काम करीत आहेत.
४)कामाला जास्त प्राधान्य दिले गेले.
पहिला लाकडाऊन लागला.त्यात लोकांना घरी कायमस्वरुपी बसावं लागलं.त्यामुळं या काळात पैशाची आबाळ झाली.त्यातच विजेचं बिल आणि पाण्याचं बिल आलं.ते एवढं तीव्र होतं की विस्कटलेल्या घडीत ते असह्य होतं.ही विस्कटलेली घडी बसविण्यासाठी लोकांना कामाला जाणं भाग होतं.मग आपली मुलं घरी अभ्यास करतात की नाही यावर त्यांना पुरेसं लक्ष देताच आलं नाही.येतही नाही.
५)मुल व पालकहीं मोबाइल खेळ खेळण्यात मग्न आहेत.
मुलं मोबाइल खेळ खेळत आहेत.तसेच पालकही मोबाइल वर गेम खेळायची.त्यांना आपल्या पाल्यांचं शिक्षणाचं नुकसान होत आहे हे कळत नाही.शिक्षक अभ्यास पाठवतात.पण या अभ्यासावर विद्यार्थी लक्ष देत नाहीत.पालक अभ्यास करवून घेत नाहीत.तसेच पालकही लक्ष देत नसल्यानं शिक्षकांची मेहनत व्यर्थ जात आहे.
६)पालकांचे पाल्यांकडे लक्ष नाही.
माझा पाल्य अभ्यास करतो की नाही याबद्दल पालक उदासीन आहे.तो कधीच आपल्या पाल्याच्या अभ्यासाची पडताळणी करीत नाहीत.फक्त खाणे व दिवसभर काबाडकष्ट करणे हेच त्यांना माहित आहे.
७)काही जणांजवळ मोबाइल नाही.स्मार्टफोन नाही.काही ठिकाणी मोबाइल रेंज नाही.
काही जणांजवळ मोबाइल आहेत.पण मोबाइल रेंज नाही.काही जणांजवळ तर मोबाईलच नाहीत.काही जणांजवळ मोबाइल आहेत.पण स्मार्टफोन नाहीत.
८) शिक्षकांचाही दोष आहे.
शिक्षणाच्या अनास्थेत शिक्षकांचाही दोष आहे.कारण ऑनलाइन शिकविणारे काही शिक्षक हे विशिष्ट वेळेत शिकवितात.गुगल मीटवर.त्यावेळी मोबाइल ची रेंज नसल्यानं काही विद्यार्थ्यांना ते पाहताच येत नाही.अशावेळी शिकविलेला भागही ऑनलाइनमुळं नंतर दिसत नाही.हे शिक्षण आफलाईन असायला हवं.विद्यार्थ्यांना केव्हाही पाहता यायला हवं.
९)गरीबी(दारीद्रता)
देशात काही काही ठिकाणी विश्वकोटीचं दारीद्र आहे.कसाबसा पालकांनी मोबाइल घेतला.परंतू त्यात नेट टाकायला पैसेच नसल्याने तसेच आधी पोट महत्वाचे असतांना पोटाचा प्रश्न सोडविताना तो कसा सोडवावा ते कळत नाही.अशाच्या मुलांना शिक्षणाबद्दल काय आस्था वाटेल.
१०) मुलांची पैदावार
शिक्षणाच्या अनास्थेत सर्वात मोठं कारण आहे.ते म्हणजे मुलांची पैदावार.काही काही घरात आजही पाच पाच सहा सहा मुलं आहेत.तीन मुलं तर भरपूर ठिकाणी आहेत.कोणाकोणाला पालक मोबाइल घेवून देणार.त्यातच लाकडाऊनं लोकांचं कंबरडं मोडलं.शिवाय ज्या ठिकाणी आफलाईन अभ्यास करण्याची सोय आहे.त्या ठिकाणी ठीक आहे.पण जिथे नाही.तिथे अनास्थाच निर्माण झालेली आहे.तुही अभ्यास नको करु.मीही नाही करत अशी अवस्था.
कोरोना काळाच्या या शाळा बंद आहे पण शिक्षण सुरु योजनेत तसं पाहिलं तर सर्वच क्षेत्रात नुकसान झालेलं अाहे.पण त्याचबरोबर शिक्षणातही अतोनात नुकसान झालेलं आहे.काही पालक आपल्या मुलांचं नुकसान होवू नये म्हणून जातीनं लक्ष देतात.पण काही पालक मात्र आजही उदासीन आहेत.त्यामुळं म्हणावसं वाटते की जर आपल्या पाल्याच्या शिक्षणाबाबत एवढं उदासीन आहात,तर मग मुलांना जन्म दिलाच कशाला? तसेच हाच प्रश्न जो माझ्या मनात आहे.तोच प्रश्न इतरांच्या मनात नसेल कशावरून? मुलं तुमचीच ना.मग दोन असो की तीन.तुम्ही मुलांच्या शिक्षणाकडं लक्ष द्यायलाच हवं.जेणेकरुन विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाबद्दल अनास्था निर्माण होणार नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

Related posts