दक्षिण सोलापूर

हत्तरसंगकुडलसंगम येथे भीमा आणि सीना नदीच्या संगमावर केले रौद्ररूप धारण

अशोक सोनकंटले
विशेष प्रतिनिधी/दक्षिण सोलापूर

दक्षिण सोलापूर तालुक्याला भीमा आणि सीना नदीच्या महापूरामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाली आहे.
परतीच्या पावसाने पूर्ण राज्यभर पावसाने हजेरी लावून सर्व धरण,तलाव,नदी,नाले,भरून वाहत असल्याने तालुक्यातील भीमा आणि सीना नदीने रौद्ररूप धारण करून नदी काठच्या गावाला पूर्ण वेढा घातला आहे.चालू काळात जुन्या नागरिकांना विचारपूस केली असता सुमारे २५ ते ३० वर्षानंतर पाहिल्यादाच इतक्या मोठ्या प्रमाणात महापूर आला आहे असे सांगत आहेत.मंद्रुपचे सीतामाई तलाव देखील पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.आणि शिरवळ येथील धुबधुबी तब्बल १५ वर्षांनी वाहत आहे.
त्याप्रमाणे दक्षिण तालुक्यातील खालील मार्ग देखील या महापुरामुळे बंद आहेत..
हत्तरसंग-बरूर,कुडलगाव ते कुडल देवस्थानमंदिर, बोळकवठा ते औराद,कुरघोट ते टाकळी, हत्तरसंग ते कोर्सेगाव, औराद ते संजवाड,वांगी ते वडकबाळ, मनगोळी ते वांगी ,राजूर ते बिरनाळ,
राजूर ते बंकलगी,सोलापूर विजापूर हत्तुरगावाजवळ रस्ता बंद आहे.राजूर,बिरनाळ,सिंदखेड,औज मंद्रुप,जुना टाकळी आणि हत्त्तरसंगकुडल श्री संगमेश्वर देवस्थान पूर्णपाण्याने वेढा घातलेला आहे….
या महापुरामुळे नदीकाठच्या शेतकरी वर्गाचे अतोनात नुकसान झालेला आहे.मुख्य म्हणजे याठिकाणी पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सुद्दा अधिकारी लोकांना येण्यासाठी मार्ग देखील बंद असल्याने पूरपरिस्थिती पाहणी थांबला आहे.दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुख्य पीक ऊस,द्राक्षे,केळी,आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.ऐन ऊसतोड सुरू होण्याच्या मार्गावर असताना नदीकाठच्या शेतकरी लोकांना यांचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.पाऊस आणि महापुरामुळे ठीक ठिकाणी विद्युत खांब पडल्याने टाकळी भागातील विद्युत पुरवठा बंद असल्याने टाकळी, बरूर,हत्तरसंग,कुडल, या भागातील देखील नागरिकांचे हाल होत आहे..

Related posts