उस्मानाबाद  कळंब

आथर्डी ता.कळंब येथे आढळले तब्बल २९ कोरोना रुग्ण

साईनाथ गवळी,
उस्मानाबाद / तुळजापूर, प्रतिनीधी.

आथर्डी ता.कळंब येथे तब्बल २९ कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामुळे या भागातील जवळपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आथर्डी ता.कळंब येथे २९ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने गावास धाराशिवचे लोकप्रिय खासदार मा. ओमराजे निंबाळकर तसेच आमदार मा. कैलासदादा पाटील यांनी भेट देऊन सद्य स्थितीचा आढावा घेतला. यानंतर गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना धाराशिव शिवसेनेच्या वतीने आर्सेनिक अल्बम-३० या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गोळ्याचे वाटप करण्यासाठी सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी उपस्थित सन्माननीय आमदार व खासदार यांनी नागरिकांना धीर देत न घाबरता काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच प्रत्येक संकटसमयी धाराशिव शिवसेना आपल्या सेवेसाठी सज्ज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी धाराशिवचे लोकप्रिय खासदार मा. ओमराजे निंबाळकर, कळंब-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे आ. कैलास घाडगे-पाटील, जि.प.सदस्य बालाजी बप्पा जाधवर, कळंब शहराध्यक्ष प्रदिप बप्पा मेटे, आत्मलिंग झटाळ, विश्वनाथ धुमाळ, गणेश झटाळ, रामेश्वर साखरे, अरुण घुले, आण्णासाहेब साखरे, पवन सावंत, डिकसळचे उपसरपंच सचिन काळे, अश्रुबा बिक्कड, अश्रुबा रणदिवे, आरोग्य कर्मचारी, आशा कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.

Related posts