उस्मानाबाद  तुळजापूर

दैनिक राजस्व च्या मराठवाडा विभागीय संपादक पदी साईनाथ गवळी यांची नियुक्ती

मराठवाडा विशेष प्रतिनिधी,
दैनिक राजस्व च्या मराठवाडा विभागाच्या विभागीय संपादक पदी तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (बु.) येथील युवक साईनाथ जगन्नाथ गवळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दैनिक राजस्व चे प्रमुख संपादक तथा राजस्व फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रसाद पवार यांच्या वतीने साईनाथ गवळी यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. साईनाथ गवळी यांच्या असलेल्या राजकीय तसेच सामाजिक ज्ञानामुळे तसेच त्याच्याकडील असलेल्या निस्वार्थी समाजसेवी भावनेमुळे त्यांनी हे पद प्राप्त केले आहे असे यावेळी मा. प्रसाद पवार यांच्या वतीने सांगण्यात आले.

नियुक्तीदरम्यान मा. प्रसाद पवार यांनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी दैनिक राजस्व परिवारातील अनेक सदस्य उपस्थित होते.

Related posts