उस्मानाबाद  तुळजापूर

ग्रामीण पञकार संघाच्या युवती प्रदेश अध्यक्ष पदी कु किरण चौधरी यांची नियुक्ती.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.

तुळजापुर – तुळजापुर येथिल पञकार कु किरण चौधरी यांची ग्रामीण पञकार संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या युवती प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

ग्रामीण पञकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दताञय यांनी कु किरण चौधरी यांना नियुक्ती पञ दिले. कु किरण चौधरी या गेल्या अनेक वर्षे पञकारीता करत असून त्यांनी तुळजापुर पञकार संघाचे अध्यक्ष यांसारखी अनेक पदे भुषवली आहेत. याबरोबरच त्यांना त्यांच्या कार्याबद्दल अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांचे सर्व कार्य पाहूनच त्यांना ग्रामीण पञकार संघाच्या युवती प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली असे मा. खेमनर यांनी सांगितले.

नियुक्ती दरम्यान कु किरण चौधरी यांचे उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बांधवांनी अभिनंदन करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व स्तरातुन पत्रकार कु. किरण चौधरी यांचे अभिनंदन होत आहे

Related posts