अक्कलकोट

अक्कलकोट नगरपरिषदचे नवे मुख्याधिकारी म्हणून गणेश शिंदे यांची नियुक्ती

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) –
अक्कलकोट नगरपरिषदचे नवे मुख्याधिकारी म्हणून गणेश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिंदे हे मूळचे नगर जिल्ह्यातले असून २०१० साली त्यांनी धारूर नगरपरिषदेमध्ये आपल्या सेवेला सुरुवात केली. त्यांचा राहुरी,आरवी, तासगाव नगरपरिषदेमध्येही मुख्याधिकारी म्हणून सेवा बजावली आहे . त्यानंतर ते अक्कलकोट येथे रुजू झाले आहेत.

अक्कलकोट शहरातील वाढते अतिक्रमण,अस्वच्छता याबाबतीत प्राधान्याने आपण लक्ष घालणार आहे. व शहरात कोरोना नियंत्रणात आहे तो आणखी कमी कसा करता येईल,याकडे आपले लक्ष असेल तसेच तीर्थक्षेत्राच्या संदर्भात विविध योजना आणि प्रलंबित विकासकामे याबाबतही आपण खास करून लक्ष देणार असून तीर्थक्षेत्र विकासाची संधी आपल्याला मिळालेलीआहे.त्या संधीचे सोने करणार आहे. प्रत्येक काम पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने शहराची विकास कामे करणार आहे,असे पदभार घेतल्यानंतर शिंदे यांनी सांगितले.

Related posts