उस्मानाबाद 

धाराशिव (उस्मानाबाद) येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक – मराठवाडा

छत्रपती शिवाजी महाराज चौक, धाराशिव (उस्मानाबाद) येथे हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख, वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या जयंतीनिमित्त साहेबांच्या प्रतिमेचे पुजन करून पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.

धारशिवचे लोकप्रिय खासदार मा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर तसेच धारशिवचे नगराध्यक्ष मा. नंदूभैय्या राजेनिंबाळकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी खा. ओमराजे निंबाळकर यांनी बोलताना स्व. बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत बाळासाहेबांच्या अनेक गोष्टींचे वर्णन केले. यामध्ये बाळासाहेबांनी संगठना बांधणीपासून ते शिवसैनिक घडवण्यासाठी जे काही कष्ट घेतले ते खा. ओमराजे निंबाळकर यांनी बोलताना सांगितले.

याप्रसंगी नगराध्यक्ष नंदूभैय्या राजेनिंबाळकर, शिवसेना कक्ष जिल्हाप्रमुख मोईन पठाण, माजी नगराध्यक्ष प्रदिप साळुंखे, दिपक जाधव, एच.एम.देवकते, राजाभाऊ घोडके, शिवसेना शहरप्रमुख पप्पू मुंडे, प्रविण कोकाटे, नगसेवक तथा गटनेते सोमनाथ गुरव, तुषार निंबाळकर, बाळासाहेब काकडे, गणेश आचलेकर, सिद्धेश्वर कोळी, भिमा (आण्णा) जाधव, पंकज पाटील, कुणाल धोत्रीकर, पांडुरंग भोसले, विजय ढोणे, बंडू आगरकर, रामेश्वर मगर, साबेर सय्यद, शेषराव उंबरे आदी पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

Related posts