उस्मानाबाद  तुळजापूर

सैनिकी विद्यालय,तुळजापूर येथे यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक – मराठवाडा.

तुळजापूर – महाराष्ट्र सरकारने यशवंतराव चव्हाण यांची जयंती दरवर्षी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रमाणेच, तुळजापूर येथील सैनिकी विद्यालयात यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली.

श्री. तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य श्री घोडके व्ही.बी. यांच्या हस्ते करण्यात आले. सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री स्वामी रमाकांत सर यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.

या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी , पर्यवेक्षक, तसेच वसतिगृह अधिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

Related posts