उस्मानाबाद 

.ह.भ.प. बोधले कळंब पत्रकार संघाचे वतीने अन्न दाता पुरस्काराचे वितरण

प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा अन्नदाता पुरस्कार वितरण काल करण्यात आले. कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा विठ्ठल रुक्मिणी २०२० अन्नदाता पुरस्कार यावर्षी कळंब येथील देवडा फाऊंडेशन व जीवराज प्रतिष्ठान यांना प्रकाश महाराज बोधले व परमेश्वर महाराज बोधले यांच्या हस्ते करसनदास पटेल व संजय देवडा यांना मंगळावर ता. ३० रोजी देऊन सन्मानित करण्यात आले.यंदाच्या पुरस्काराचे हे दहावे वर्ष आहे.वर्षभर विविध सामाजिक कामात अग्रेसर राहून अन्नदाता करणाऱ्या व्यक्ती संस्थाना हा पुरस्कार देण्यात येतो, यावर्षी वर्षभर व कोरोना लोकडाऊन च्या काळात करसन पटेल , अभय देवडा, यांच्या संस्थेने मोठ्या प्रमाणावर अन्नदान करून , कर्मचारी, सर्व सामान्यांना व गरजूंना घरपोच अन्नदान करून कुणीही उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली होती

त्यामुळे देवडा फाऊंडेशन व करसन पटेल यांच्या जीवराज प्रतिष्ठान यांची या दोन्ही संस्थांची विठ्टल-रूक्मीणी २०२० अन्नदाता पुरस्कार साठी निवड करण्यात आली होती, विठ्ठल रुक्मिणी याच्या प्रतिमेचे छायाचित्र असलेले पुरस्काराचे वितरण प्रसंगी विश्वस्त सतीश टोणगे, डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. सचीन पवार, संदीप बावीकर, माणिक बोंदर, हेमंत रामढवे, रतनसी पटेल, गंगदास पटेल संघाचे अध्यक्ष परमेश्वर पालकर यांच्यासह शहरातील पत्रकार संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते

Related posts