महाराष्ट्र

सिमाई आधार फाऊंडेशन ट्रस्टच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी – अमर पवार

प्रतिनिधी : – सिमाई आधार फाऊंडेशन ट्रस्टच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी अमर दत्तात्रय पवार यांची निवड करण्यात आली आहे.
सिमाई आधार फाऊंडेशन ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा सौ.सिमाताई पवार व पुणे जिल्हाध्यक्ष मिनाक्षी हारगुडे यांच्या हस्ते अमर पवार यास नियुक्ती पत्र देण्यात आले .यावेळी गोरगरीब लोकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवण्याचे आव्हान केले गेले. यावेळी सिमाताई पवार, मिनाक्षी हारगुडे ,मयुर आगवणे,किशोर कांबळे,पंकज आगवणे उपस्थित होते.या निवडीनंतर अमर पवार यांनी संस्थापक अध्यक्षा सौ सिमाताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सिमाई आधार फाऊंडेशन मजबुत करून, गोरगरीब लोक,दिन दलित,निराधार महिला,कुमारी माता,निराधार बालक,निराधार वृद्ध,अपंग,कामगार, विद्यार्थी व इतर समाज घटकांच्या हक्कासाठी व सन्मानासाठी काम करण्याचे आश्वासन दिले आहे.

Related posts