उस्मानाबाद 

कृषि महाविद्यालय आळणी (गडपाटी) येथे कृषि शिक्षण दिवस साजरा.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा.

उस्मानाबाद – कृषि महाविद्यालय आळणी (गडपाटी) येथे कृषि शिक्षण दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

भारताचे माजी राष्ट्रपती व पहिले कृषिमंत्री डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त कृषी महाविद्यालय आळणी येथे कृषी शिक्षण दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयामध्ये ‘फेस्टिवल ऑफ ॲग्रीकल्चरल स्टुडन्टस ‘सदरा अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले, त्यामध्ये प्रामुख्याने निबंध स्पर्धा, चित्रकला, चारोळी, कविता लेखन व्याख्याने इत्यादी विषयावर विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद नोंदविला. स्पर्धा ऑनलाईन असल्याकारणाने विद्यार्थ्यांचे निबंध, चित्रांकन, चारोळी,कविता ऑनलाइन मागवण्यात आल्या विद्यार्थ्यांनी निबंध लेखनातून आपली कृषीविषयक प्रेम व कृषी क्षेत्राची व्याप्ती याबद्दल अतिशय सुंदर शब्दांमध्ये आपले मत मांडले आहे. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद अतिशय कौतुकास्पद होता.

महाविद्यालयाचे नवनियुक्त प्राचार्य डॉक्टर क्रांतीकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील संधी व कृषी क्षेत्रापुढील आव्हाने याविषयी सखोल मार्गदर्शन केले, तर प्राध्यापक बंडे कालिदास यांनी कृषी क्षेत्राकडे तरुणाईचा कल वाढल्यास कृषी क्षेत्रामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल अशी आशा व्यक्त केली. मृद शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख नंदकिशोर सुतार यांनी कृषी शिक्षणामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब वाढण्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार होणे गरजेचे आहे व याकडे युवक व युवतींचा जास्त कल असला पाहिजे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नंदकिशोर सुतार यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष पद डॉक्टर क्रांतीकुमार पाटील यांनी भूषवले.

कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक फडतरे सर, प्रा. गुरव सर, प्रा. शेटे सर, भालेकर सर, दळवी सर, प्रा. गार्डी सर, खताळ सर, गायकवाड सर, बुरगुटे सर, साठे सर प्राध्यापिका पाटील मॅडम, साबळे मॅडम, वाकळे मॅडम व इतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी सहकार्य केले तथा कार्यक्रमासाठी विशेष सहाय्य महाविद्यालयाचे व्यवस्थापक प्राध्यापक हरी घाडगे यांनी केले व अध्यक्षांच्या समारोपाने कार्यक्रम संपन्न झाला.

Related posts