उस्मानाबाद  कळंब

मलकापूर येथे कृषिदूतांकडून कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा.

पुरूषोत्तम बेले
धाराशिव/जिल्हा प्रतिनिधी

धाराशिव – कृषी महाविद्यालय आळणी च्या विद्यार्थ्यांकडून (कृषिदूतांकडून) मलकापूर येथे कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. वसंतराव जी नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त 01 जुलै हा दिवस मौजे मलकापुर तालुका कळंब येथे कृषी महाविद्यालय आळनी गड पाटी च्या ग्रामीण जागृकता कार्यक्रमाअंतर्गत सातव्या सत्रातील प्रविष्ठ विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला. कृषी दिनानिमित्त मलकापूर येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी गावामध्ये वृक्षदिंडी काढून वृक्षारोपणाचे महत्व सांगून जनजागृती केली. कृषी दिनानिमित्त महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील भरीव योगदान व त्यांचे उल्लेखनीय कार्य यामुळे महाराष्ट्र हा अन्न धान्यासाठी स्वयंपूर्ण कसा झाला याबद्दल कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक सुतार एन एस यांनी मार्गदर्शन केले.

सदरील कार्यक्रमासाठी गावचे सरपंच घोळवे मॅडम, ग्रामसेवक वेदपाठक साहेब तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भांगे सर सहशिक्षक अनपट मॅडम, अंगणवाडी सेविका पायाळे मॅडम तसेच गावातील नागरिक नितीन लोमटे, हेमंत लोमटे, अजित लोमटे रणजित लोमटे,बालाजी लोमटे यांनी कार्यक्रम सफल होण्यासाठी अत्यंत मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमामध्ये सातव्या सत्रातील कृषिदूत विशाल चिखलकर , सुमित चव्हाण, हरीश दाने ,सुजित दराडे , अमोल अलापुरे , संदेश भुतेकर,तेजस चव्हाण व कृषिकन्या रेवती चव्हाण,ऋतुजा बाबर,सोनाली बरगले यांचा सहभाग होता.

Related posts