कविता 

शेती आमुची- – –

पहाट झाली
आरवला कोंबडा
आई उठली
कामाला लागली
झाड लोट
शेण पाणी
सडा सारवण
गाईला चारा
बैलाला पाणी
सोडून पाडस
धारिला लागली
बाबा उठले
गोठयची सफाई
बैल सोडले
नदी ओलांडली
शेती आली
मोट ओढली
पाणी सोडले
बघता बघता
पाखरे आली
चिव चिव झाली
गोफण फिरवली
थवा उडाला
शेती आमुची
धनाची पेटी ।
करोनी कष्ट
सोन्याची,मोत्याची
रास पिकवली…

कवि:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय,तुळजापूर. जिल्हा उस्मानाबाद.

Related posts