बार्शी

कर्ज मागणीसाठी बँकेत गेल्यानंतर बँक अधिकारी कर्जदारास अपमानास्पद वागणूक देत असून त्यांच्याशी अरेरावीने वागत आहेत. अशा सर्व अधिकाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाची गुन्हे दाखल करण्यात यावेत- खासदार ओमराजे निंबाळकर.

वैराग प्रतिनिधी :
कर्ज मागणीसाठी बँकेत गेल्यानंतर बँक अधिकारी कर्जदारास अपमानास्पद वागणूक देत असून त्यांच्याशी अरेरावीने वागत आहेत. अशा सर्व अधिकाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाची गुन्हे दाखल करण्यात यावेत. अशी सूचना बार्शी उस्मानाबाद मतदार संघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे.त्यांच्या ह्या सुचनेमुळे बँक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

अनेक बँकांनी महिला बचत गट आणि पिक कर्ज वाटपास दिलेले उद्धिष्ट अद्यापपर्यंत पूर्ण केले नाही. त्यांचा चांगलाच समाचार खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतला. त्यांनी दिशासमितीच्या बैठकीमध्ये मुंबई येथुन व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या वेळी पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांकडून ऑनलाइन/ ऑफलाईन द्वारे तक्रारी केल्या गेल्या आहेत. अशा शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण करून पिक विमा मिळवून देण्यास तसेच शासनाने जाहीर केलेली मदत मिळवून देण्यास प्रशासनाने त्वरीत प्रयत्न करावेत.बार्शी तालुक्यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत टप्पा क्र.1,2,3 मध्ये झालेल्या रस्ता दुरुस्ती कामाचा आढावा घेतला.दिशा समितीच्या बैठकीत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामाची अपूर्ण माहिती बैठकीला सादर केली त्यामुळे या विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना कडक समज देण्यात आली तसेच याविभागा मार्फत झालेल्या सर्व रस्त्याचा लवकरच प्रत्यक्ष पाहणी दौरा आयोजित केला जाईल असे ठरवण्यात आले.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (MREGS) अंतर्गत तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतने एक रस्ता व एक रस्ता यंत्रणेवरती करण्याच्या यापूर्वी सूचना केल्या होत्या. परंतु सदर सूचना अंमलात आली नसल्याचे निदर्शनास आले आहे. प्रशासकीय यंत्रणेने प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर रस्त्याची दोन कामे चालू करावीत. असे निर्देश दिले.BSNL या कंपनीने device न दिल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत ऑनलाइन नाहीत. यावर केलेला शासनाचा खर्च वाया गेल्याने त्या सर्व सर्व ग्रामपंचायत ऑनलाईन चालू करून घ्याव्यात.राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य कार्यक्रम अंतर्गत निराधारांच्या बैठका वेळोवेळी घेण्यात याव्यात. व पात्र लाभार्थी अनुदाना पासून वंचित राहू नयेत. याची दक्षता संबंधित तहसीलदार यांनी घ्यावी.


सोलापूर जिल्ह्याची जिल्हास्तरीय #दिशा_समिती बैठक संपन्न झाली या बैठकीस, उस्मानाबाद मतदार संघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी #मुंबई येथुन व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे सहभाग घेतला.

दीनदयाळ अंत्योदय योजने अंतर्गत HVDS ची कामे पूर्ण करावीत. शेती पंपाचे वैयक्तिक अर्ज भरून घेऊन त्यांना डिमांड तात्काळ देण्यात यावेत.
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना खाजगी नोकरी भेटली की नाही याची खातरजमा करावी.पायाभूत राष्ट्रीय महामार्गवर रस्ते/ नाली न केल्या मुळे शेतीचे,पीकांचे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. अशां शेतकऱ्यांना राष्ट्रीय महामार्ग मार्फत मदत द्यावी. केंद्र सरकारच्या विविध योजनाच्या कामाचा आढावा घेऊन प्रामुख्याने बैठकीत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मुद्दे मांडून प्रशासनास पाठपुरावा करण्याच्या सूचना केल्या.याबैठकीस सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचारी स्वामी महाराज, माढा लोकसभा मतदारसंघाचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, जि.प.अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आ. बबनदादा शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त मुख्य अधिकारी अर्जुन गुंडे तसेच सर्व सन्मानित सदस्य, योजनेचे अधिकारी वर्ग उपस्थित होते.

Related posts