तुळजापूर

800 हेक्टर अतिरिक्त लक्षांक वाढवून द्यावा – कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे मागणी.

साईनाथ गवळी,
उस्मानाबाद/तुळजापूर प्रतिनिधी.

आज राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे साहेब यांच्या दालनात उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर व शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील यांनी भेट घेऊन उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्याला रब्बी हंगाम सन 2020-21 बीजोत्पादन कार्यक्रम करिता 800 हेक्टर अतिरिक्त लक्षांक वाढवून देण्याबाबत विनंती केली.
उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यामध्ये रब्बी हंगाम 2020 साठी हरभरा पिकांचे 1000 एकर इतका लक्षांक देण्यात आलेला आहे. परंतु दिलेला लक्षांक अपुरा पडत असल्याने अनेक शेतकरी यापासून वंचित राहत आहेत. मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले. आपल्या मार्फत रब्बी हंगाम 2020 करीता अतिरिक्त 800 हेक्टर एवढा लक्षांक वाढवून देण्याबाबत आदेशीत करण्यात यावे. अशी यावेळी मागणी करण्यात आली.

Related posts