तुळजापूर

अभिनेत्री. अश्विनीताई महांगडे यांच्या वाढदिवसानिमित्त किलज येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न.

साईनाथ गवळी,
तुळजापूर/उस्मानाबाद प्रतिनिधी,

किलज, ता.तुळजापूर येथे रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा- अभिनेत्री.अश्विनीताई महांगडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.यामध्ये या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी. पाटील क्लिनिक सलगरा(दि)येथील डॉ.सचिन पाटील, पंचायत समिती सदस्य.खंडेराव शिंदे, ज्ञानेश्वर कुठार, बालाजी शिंदे, ग्रामविकास अधिकारी. मातोळे श्रीकांत कोनाळे, भरत गवळीसह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

सध्याच्या काळात आरोग्य जपण हे अत्यंत आवश्यक असून वेळोवेळी तपासण्या घेणे गरजेचे आहे.या हेतूने रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान चे उस्मानाबाद जिल्ह्यातील सदस्य यांनी हा अनोखा उपक्रम आयोजित केला होता.या शिबिरामध्ये रुग्णांची तपासणी करण्यात आली.याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रतिष्ठानचे सदस्य.युवावक्ते. राम जळकोटे यांनी केले तर शेवटी आभार गणेश काटे यांनी मांडले.

प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत हे शिबीर पार पडले.यावेळी प्रसाद राजमाने, मनोज देवकते, वैभव मुळे, गणेश काटे,प्रतीक भोसले,अविष्कार फस्के, राम जळकोटे, आणि शुभम नलावडे हे प्रतिष्ठान चे सदस्य उपस्थित होते.या अनोख्या कार्यसाठी केलेल्या सहाय्यबदल प्रतिष्ठानच्या सदस्य वतीने डॉ.सचिन पाटील यांचा शेवटी आभारपर प्रमाणपत्र, शाल,श्रीफळ देऊन सत्कार केला.

Related posts