करमाळा

अभिनव भारत समाज सेवा मंडळाच्या वतीने आळसुंदे येथे १०० जांभुळांच्या रोपांचे वाटप

करमाळा प्रतिनिधी उमेश पवळ

आळसुंदे ता.करमाळा जि. सोलापर ये थे जांभळाच्या रोपांची वृक्ष लागवड करण्यात आले. तत्पूर्वी गावातील कुटुंबाचा सर्वे करून त्यांना आपला दारात कोणती प्रकारचे वृक्ष लागवड करवायचे आहे ही माहिती घेतली व वृक्षारोपणाच्या अगोदर जांभुळाच्या झाडासाठी खड्डे खादले की नाही याची खात्री केली व सदर झाडाला पाणी घालणे व वाढवणे याची खात्री गावातील लोकांनी दिली. आळसुंदे फाटा ते आळसुंदे गाव या रस्ता च्या दोन्ही बाजूनी झाडे लावण्याचे कबूल केले त्यामुळे लाभार्थीच्या सर्वानुमते जांभूळांची रोपे ठरविण्यात आले. त्यानंतर संस्थांच्या वतीने जल दूत या प्रकल्पाच्या अंतर्गत १०० जांभूळांची रोपे खरेदी करून गावात असणार्‍या प्रत्येक कुटुंबाच्या घरासमोर सदर रोपे लागवड करण्यात आली

या वेळी गावाचे सरपंच श्री.गुलाबराव भीमराव देवकते यांचा हस्ते वृक्षारोपण केले या कार्यक्रमासाठी अभिनव भारत समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष संतोष राऊत, गावाचे अध्यक्ष जोतीराम घाडगे ,माजी .सरपंच सदाशिव पाटील , जल दूत दशरथ कोळी व समस्त गावकरी उपस्थित होते. ६ व ७ जून रोजी सदर वाटप केलेल्या जांभुळाच्या रोपाची लागवड केली नाही याची खात्री जल दूत दशरथ कोळी यांनी पाहणी केली व फोटो काढले .सदर वृक्ष लागवड कार्यक्रम हा लहान व युवक यांच्या उत्साह चांगला वाटला सदर रोपाचे वाटप मोफत केल्यामुळे आळसुंदे ग्रामस्तानी समाधान व्यक्त केले,जलदुत प्रकल्पाअंर्तगत सेवावर्धिनी संस्थेने आर्थीक सहकार्य केले.

Related posts