दक्षिण सोलापूर

भीमा नदीचा पात्रात तरुण वाहून गेल्याने युध्द पातळीवर शोधमोहिम सुरु

अशोक सोनकंटले/हत्तरसंग विशेष प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथील भीमा नदीच्या पात्रात अचानक जोरात आलेल्या पाण्याच्या प्रवाहात तरुण वाहून गेल्याने एकच खळबळ उडाली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की मुत्तण्णा सणप्पा बिराजदार (वय- ३२) रा, भंडारकवठे. हा तरुण आज मंगळवार. दि.८ रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास भीमा नदीच्या पात्रातील विद्युत मोटार पाईप काढण्यासाठी गेला होता.
मोटार पाईप काढत असताना नदीच्या पात्रात अचानक जोरात पाण्याचा प्रवाह आल्याने मुत्तण्णा पाण्यात वाहून गेला आहे.पाण्यात बेपत्ता झालेल्या मुत्तण्णाला शोधण्यासाठी गावातील काही तरुण सामाजिक कार्यकर्ते दुथडी भरुन वाहणाऱ्या नदीच्या पात्रात शोध घेत आहेत ,
मुत्तण्णा नदीच्या पाण्याच्या प्रवाहात बेपत्ता होऊन आठ तास झाले अद्याप ही त्याचा शोध लागला नाही .
यामुळे गाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे .

Related posts