पंढरपूर

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपुरात चार दिवस संचारबंदी लागू होणार

पंढरपूर :
श्रीविठ्ठलाच्या कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त पंढरपूर नगरीत भाविकांची गर्दी होऊ नये. यासाठी २२ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजल्यापासून ते २६ नोव्हेंबरपर्यंत संचारबंदी कायदा लागू करण्यात येणार आहे. या यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दिला असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे.

कार्तिकी यात्रेसंदर्भात माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक आतुल झेंडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण पवार, किरण अवचर, प्रशांत भसमे उपस्थित होते.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत कार्तिकी एकादशीचा सोहळा भरल्यास राज्यभरातील वारकरी पंढरपुरात एकत्र येतील. यामुळे कोरोनाचा अधिक प्रसार होईल. त्यामुळे पंढरपूर नगरीत वारकर्‍यांची गर्दी होऊ नये. यासाठी कार्तिकी यात्रा भरून न देण्याचे शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार भाविकांना पंढरपुरात न येऊ देण्यासाठी १८०० पोलिसांचा बंदोबस्त जिल्हा व पंढरपूर शहर परिसरात लावण्यात आला आहे. तसेच पंढरपूर कडे येणाऱ्या मार्गावर नाकाबंदी करण्यात आले आहे. त्याचबरोबर २२ ते २६ नोव्हेंबर पर्यंत एस टी बंद राहणार आहे.

त्याचबरोबर पंढरपूर शहर व शहरालगतच्या १० किलोमीटर परिसरामध्ये व १० गावांमध्ये संचार बंदी कायदा लागू करण्यात येणार आहे. मात्र शहरांमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले.

Related posts