उस्मानाबाद 

धाराशिव (उस्मानाबाद) तालुक्यातील ९२ वर्षाच्या आजोबांनी केली कोरोनावर मात ; प्रबळ इच्छाशक्ती व सकारात्मक वृत्तीमुळे शक्य.

खा. ओमराजे निंबाळकर यांनी आजोबांना दीर्घायुष्यासाठी दिल्या शुभेच्छा.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.

धाराशिव (उस्मानाबाद) – धाराशिव (उस्मानाबाद) तालुक्यातील एका ९२ वर्षाच्या आजोबांनी आपल्या प्रबळ।इच्छाशक्ती व सकारात्मक वृत्तीमुळे कोरोनावर विजय मिळवला आहे.

धाराशिव (उस्मानाबाद) तालुक्यातील 92 वर्षांचे देविदास गुंडीबा कांबळे नामक आजोबांनी आजोबांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना आजारावर जबरदस्त इच्छाशक्ती, धैर्य, संयम आणि मुख्य म्हणजे सकारात्मक वृत्ती असेल तर कोरोनावर निश्चितपणे मात करता येते. उस्मानाबाद तालुक्यातील वरुडा गावचे ९२ वर्षांचे देविदास गुंडीवा कांबळे गेली 6 दिवस जिल्हा सामान्य रुग्णालय येथे अँडमिट होते. आजोबांनी कोरोना आजारातून व्यवस्थित झाले असता. आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

९२ वर्षांचे आजोबांना कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर कुटुंबीयांना काळजी वाटू लागली. कारण आजोबांचे वय. आजोबा न घाबरता. इच्छाशक्ती व सकारात्मक वृत्तीमुळे आज आजोबा कोरोनावर मात करून घरी गेले आहेत. कोरोनाचा सामना कसा करायचा याचे या आजोबांनी उत्तम उदाहरण आहे. या आजोबासारखे तणावमुक्त होऊन उपचार घेतल्यास कोरोनाला सहज पराभूत करता येऊ शकते.

आजोबांनी ९२ व्या वर्षी पण कोरोनावर विजय मिळवून नागरिकांसमोरील भीती पळवून लावण्यासाठी एक आदर्श निर्माण केला आहे असे मत यावेळी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केले. यावेळी खा. ओमराजे निंबाळकर यांनी आजोबांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देत, ९७ टक्के पेक्षा अधिक रुग्ण पूर्णपणे बरे होत आहेत. त्यामुळे काळजी करू नये, योग्य ती काळजी घ्यावी. असे आवाहन यावेळी नागरिकांना केले.

Related posts