महाराष्ट्र

आज आणखी 49 खासदार निलंबित, महाराष्ट्रातील सुप्रीया सुळे, अमोल कोल्हेंचा समावेश

लोकसभेच्या खासदारांच्या निलंबनाचं सत्र आजही सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. कालच्या निलंबनावरुन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरलं होतं. अशातच आजही आणखी 49 खासदारांचं निलंबन लोकसभा अध्यक्षांकडून करण्यात आलं आहे. आज निलंबित झालेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे निलंबित करण्यात आलं आहे. तर, लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहातून आतापर्यंत 141 खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे.

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन घेरलं. संसदेच्या सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्याची मागणी करत विरोधकांनी गोंधळ सुरू केला. लोकसभेत अध्यक्षांचा अपमान करणाऱ्या अनेक खासदारांना आज पुन्हा निलंबित करण्यात आलं आहे. यामध्ये काँग्रेस खासदार शशी थरूर, सपा खासदार डिंपल यादव आणि महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या नावांचा समावेश आहे.

आज 41 खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय आठ राज्यसभा खासदारांनाही निलंबित करण्यात आलं आहे. यासोबतच आतापर्यंत दोन्ही सभागृहातील 141 खासदारांवर कारवाई करण्यात आली आहे. 18 डिसेंबरपर्यंत एकूण 92 खासदारांचं निलंबन करण्यात आलं होतं.

आज कोणत्या खासदारांचं निलंबन?
सुप्रिया सुळे
अमोल कोल्हे
मनीष तिवारी
शशी थरूर
मोहम्मद फैसल
कार्ती चिदंबरम
सुदीप बंदोपाध्याय
डिंपल यादव
दानिश अली

Related posts