पंढरपूर

पंढरपूर तालुक्यात 360 शाळा सुरू..

(प्रतिनिधी) पंढरपूर गणेश महामुनी

– आज पासून पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात सर्व शाळा सुरू करण्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे. पंढरपूर तालुक्यात 360 प्राथमिक आणि माध्यमिक असे पहिली ते सातवी शाळांचे वर्ग सुरू झाले आहेत. पंढरपूर येथील द.ह. कवठेकर शाळे मध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. आलेल्या विद्यार्थ्यांचे तापमान तसेच ऑक्सीमीटर ने ऑक्सिजन तपासून विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला.
यावेळी पालक व विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला.

Related posts