तुळजापूर

प्राथमिक आरोग्य केंद्र सलगरा (दि.) येथे करण्यात आले २७८ प्रकारच्या औषधांचे वाटप.

प्रतिक भोसले,
सलगरा (दि.) प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यातील सलगरा दिवटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दि. २१ डिसेंबर रोजी एस.आर.तोगरे (थोर समाजसेवक) हे मूळचे लातूर जिल्ह्यातील असून उरण, नवी मुंबई येथे राहतात यांचे सामाजिक क्षेत्रातील कामं ही उल्लेखनीय आहेत.

समाजसेवक तोगरे यांच्या मार्फत आणि किलज येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नागनाथ कुठार (मुंबई) यांच्या सहाय्याने या २७८ प्रकारच्या औषधांचे वाटप करण्यात आले. कुठार यांच्या सहाय्याने यापूर्वीही परिसरातील विविध आरोग्य केंद्रांना औषधे वाटप करण्यात आली आहेत. जवळपास ७० हजार रुपयांची औषधे सलगरा (दि.) येथे वाटप करण्यात आली आहेत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नागनाथ कुठार हे मूळचे तुळजापूर तालुक्यातील किलज गावातील असून ते पोलीस खात्यात असून सुद्धा त्यांनी सामाजिक क्षेत्रातील विविध कामे पार पाडली आहेत, त्यांचे गावासोबत असलेले आपुलकीचे नाते हे विविध सामाजिक कार्यातून दिसून येत आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र सलगरा (दि.) येथे करण्यात आलेल्या विविध २७८ प्रकारच्या औषध वाटपाचा स्वीकार करीत वैदयकीय आधिकारी डॉ.अविनाश गायकवाड यांनी आभार मानले, त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवरांनी कोरोनाच्या काळात एका देवदूतासमान कार्य करीत जनतेची सेवा करणाऱ्या आशाकार्यकर्त्या, आरोग्य कर्मचारी यांचे आभार मानले. प्रा.आरोग्य केंद्र सलगरा (दि.) येथील सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकारी. डॉ. गायकवाड,किलज गावचे माजी सरपंच लक्ष्मण शिंदे, माजी सैनिक तथा किलज गावचे चेअरमन पंडित जळकोटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नागनाथ कुठार नवी मुंबई माजी पोलीस उपनिरीक्षक शिवराज मरडे, प्रा. चंद्रशेखर कुठार, शिवाजी कुठार, मल्लिकार्जुन येलुरे, अभिनेता प्रवीण कुठार, माजी उपसरपंच दगडू शिंदे, भाऊराव शिंदे, शांतिर पटणे, गणेश कुठार, राहुल गिरमल सह आदी मान्यवर उपस्थित होते.

Related posts