अक्कलकोट

अक्कलकोट विधानसभा क्षेत्र रस्ते व विश्रामगृह साठी 10.40 कोटी रुपये मंजूर : आ. सचिन कल्याणशेट्टी

अक्कलकोट, ता.०९: अक्कलकोट विधानसभा क्षेत्रात मागील निवडणुकीत रस्त्यांची अवस्था मोठी बिकट बनली असल्याचे सर्वत्र फिरत असताना जाणवत होते.आता सतत पाठपुरावा व मागणी करून विधानसभा क्षेत्रातील सहा विविध रस्ते आणि नवीन विश्रामगृह बांधकाम यासाठी एकूण 10.40 कोटी रुपये अर्थसंकल्पाद्वारे मंजूर करून घेतले असल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे.

रस्त्यांबरोबरच अक्कलकोट शहरात सध्या अस्तित्वात असलेले विश्रामगृह हे अतिशय वाईट अवस्थेत आणि गैरसोयीचे होते. अक्कलकोट येणाऱ्या वाढत्या स्वामी
भक्तांसाठी एक आधुनिक सोयीसुविधांचा समावेश असलेले विश्रामगृह होणे आवश्यक होते.त्यासाठीही निधी मंजूर झाल्याची माहिती कल्याणशेट्टी यांनी दिली आहे.निधी मंजूर झालेले रस्ते पुढीलप्रमाणे आहेत. सुलेरजवळगे ते केगाव व मुंढेवाड़ी मार्गे अंकलगे रस्ता प्रजिमा क्रमांक 49 (1.50 कोटी), अंकलगे ते आळगे व शेगांव मार्गे मुंढेवाड़ी रस्ता प्रजिमा क्रमांक 59 ( 1.50 कोटी),वळसंग ते तीर्थ मार्गे चपळगांव रस्ता प्रजिमा क्रमांक 149 (1.20 कोटी),अक्कलकोट स्टेशन ते शावळ मार्गे हिळळी रस्ता प्रजिमा क्रमांक 58 (1.50 कोटी), साफळे ते बादोले मार्गे घोसळगांव रस्ता क्रमांक 53 (1.25 कोटी), चपळगांव ते बऱ्हाणपूर व डोंबरजवळगे मार्गे दर्शनाळ (1.25 कोटी),अक्कलकोट येथील व्हीआयपी शासकीय विश्रामगृह (2.20 कोटी) असा एकूण 10.40 कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

तडवळ भागात ऊसशेती मोठी आहे तिथे वाहनांची वर्दळ मोठी असते आणि तिथले रस्ते खराब असल्याची सतत तक्रार केली जायची आता त्यातील काही रस्त्याना निधी प्राप्त झाल्याने थोडा दिलासा मिळणार आहे.

Related posts