उस्मानाबाद 

छत्रपती शिवरायांची 391 व्या जयंती निमित्त साकारली 0.5 लिड पेन्सिल मायक्रो कलाकृती.

प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

उस्मानाबाद:-छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त उस्मानाबाद जिल्ह्यातील कलाकार राजकुमार कुंभार यांच्या कलाविष्कारातून छत्रपती शिवाजी महाराजांची 0.5 आकारातील सर्वात लहान लीड पेन्सिल चा सिस्यावरती प्रतिकृती तयार करण्यात आली आहे ही कलाकृती पूर्वी तयार केलेल्या 0.7 आकरातील विश्वविक्रमी कलाकृती पेक्षाही मायक्रो असून त्याचीही नोंद विश्वविक्रमा मध्ये होणार आहे.

नोंद करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केले असून ही कलाकृती लवकरच विश्वविक्रम मध्ये नोंदवली जाणार आहे. ही कलाकृती जगातील सर्वात लहान छत्रपती शिवरायांची मायक्रो स्कल्पचर आर्ट म्हणून ओळखली जाणार आहे.

राजकुमार कुंभार यांची ही 13 वी विश्वविक्रमी कलाकृती ठरणार आहे..

Related posts