पंढरपूर

पंढरपुरात अतिरेकी घुसला आणि सापडलाही !

सचिन झाडे पंढरपूर प्रतिनिधी 

– पंढरीच्या विठ्ठल मंदिर परिसरात आज एक अतिरेकी घुसला आणि अत्यंत त्वरेने पोलिसांनी अवघा परिसर व्यापून टाकला आणि काही क्षणात या अतिरेक्याला जेरबंद करण्यात यश आले.गणेशोत्सव आणि मोहरम या सणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क असून या सतर्कतेचीच तपासणी पोलिसांच्या वतीने घेण्यात आली

.पोलिसांनीच एक नकली अतिरेकी मंदिर परिसरात पाठवला. त्याच्या संशयास्पद हालचालीवरून नागरिकांना संशय येताच एक नागरिकाने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांना ही बातमी मिळताच काही क्षणात पोलीस यंत्रणा या परिसरात पोहोचली आहे त्यांनी कौशल्याने या अतिरेक्याला जेरबंद केले. सणावाराच्या काळात दहशतवादी घुसला तर पोलीस किती सतर्क आहेत हे पाहण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख यांचं आदेशाने मंदिर परिसरात असलेल्या दर्शन मंडपात हा मॉक ड्रील घेण्यात आला.

नागरिकांच्या फोन आल्यानंतर पोलीस किती वेळात पोहोचू शकतात हे पाहण्यात आले परंतु या चाचणीत पोलीस सतर्क असल्याचे दिसून आले. अतिरेकी आल्याची खबर मिळताच सशस्त्र पोलिसांनी मंदिर परिसराला वेढा घेतला. या सर्व प्रकारामुळे परिसरातही प्रारंभी खळबळ उडाली परंतु नंतर ही चाचणी असल्याचे सर्वानाच समजले या चाचणीत सर्व यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आणि जलद हालचाली करून या बuनावट अतिरेक्याला जेरबंद केले, बॉम्ब शोधक पथक, क्यू आर टीम, आर सी पी., एस आर पी, शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी, मंदिर सुरक्षा शाखेचे कर्मचारी तसेच पंढरपूर उपविभागातील कर्मचारी आदी विभागांनी सहभाग घेतला.पोलिसांची सतर्कता तपासण्यासाठी घेतलेली ही चाचणी यशस्वी झाली आणि या यंत्रणेने बनावट अतिरेक्याला त्वरेने जेरबंद करून त्याची तपासणीही केली, अचानक गोंधळलेल्या नागरिकांनी उशिराने मोकळा श्वासही घेतला.

Related posts