सोलापूर शहर

गैरहजर राहणाऱ्या डॉक्टरांनो सावधान !

– कोरोना बाध‍ित रुग्णांना गैरहजर राहून उपचार नाकारणाऱ्या च‍िडगुपकर हॉस्प‍िटलमधील वैद्यकीय अध‍िकारी आण‍ि कर्मचारी अशा आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. कोव‍िड 19 संन‍ियंत्रण अध‍िकारी धनराज पांडे यांनी ही माह‍िती द‍िली.


श्री. पांडे यांनी सांग‍ितले की, च‍िडगुपकर हॉस्प‍िटलमधील तीन डॉक्टर आण‍ि पाच कर्मचारी आज दवाखान्यात गैरहजर असल्याचे स्पष्ट झाले. त्यामध्ये डॉ. प्रांजल सव्वालाखे, डॉ. ऋषभ मंडलेचा, डॉ. व‍िश्वनाथ ब‍िराजदार, रेश्मा सुरवसे, तनुजा मेंडापुरे, काजल सुरवसे, महेश मोन, व‍िजय जाधव यांचा समावेश आहे. या सर्वांव‍िरुध्द फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये कलम 122, 51 ब, 57, 269 आणि 336 यांच्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related posts