बार्शी

गावाच्या तरूणांची गावातील गरजूवंतांना मदत

मालवंडी,बार्शी तालुक्यातील मालवंडी येथे छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक व बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मदतीचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला गावातील  प्रतिसाद देत, विविध शहरात शिक्षण, नोकरी साठी गेलेल्या गावातील तरूणांनी गावाप्रती माणुसकी दाखवून धान्य व देणगीच्या स्वरूपात मदत केली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळा मालवंडी येथे सकाळी किराणा सामान व धान्य वाटप करण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष समाधान काटे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.कोरोनामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना काम उपलब्ध होत नसल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत.या गरजू नागरिकांना मदतीचा हातभार म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला होत.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रविण पाडूळे,माजी पंचायत समिती सदस्य बाबासाहेब काटे, उपसरपंच संतनाथ खंडागळे, ग्रामसेवक सय्यद.समीर शेख, पोलिस पाटील पांडुरंग सलगर,चाॅद शेख, कोतवाल बबन चतूर, बालाजी गिड्डे, नितीन खंडागळे, संजय पाडूळे,सकलीन मुजावर इत्यांदी उपस्थित होते.

Related posts