29.9 C
Solapur
September 27, 2023
महाराष्ट्र

कटकारस्थान करून मुख्यमंत्रीपदावरून काढण्यात आले त्यानंतर मला राज्यपाल करून आंध्र प्रदेशमध्ये पाठवले

पक्षातील लोकांनी कारस्थान करुन मला मुख्यमंत्रीपदावरुन काढले मात्र तेव्हापासून आजपर्यंत त्यांना पराभव पत्करावा लागला असल्याचे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले. सोलापुरात महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळातर्फे भारत गौरव पुरस्कार शिंदे यांना देण्यात आला, या सत्काराला उत्तर देताना शिंदे यांनी मनातील खदखद व्यक्त केली.
यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले की, मला कटकारस्थान करून मुख्यमंत्रीपदावरून काढण्यात आले. त्यानंतर मला राज्यपाल करून आंध्र प्रदेशमध्ये पाठवण्यात आले. राज्यपाल पदावरून मी पुन्हा दिल्लीत केंद्रीय मंत्री म्हणून गेलो. मात्र, कटकारस्थान करणाऱ्या नेत्यांना ‘जो’ पराभव स्वीकारावा लागला तो अजूनपर्यंत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. आपण आपले काम प्रामाणिकपणे करत राहिले पाहिजे असे मला वाटते असेही सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. सुशीलकुमार शिंदे यांनी निशाणा साधलेले नेते कोण याची चर्चा आता रंगू लागली आहे.
चांगलं काम लोक विसरतात

कटकारस्थान करून मुख्यमंत्रीपदावरून काढण्यात आले त्यानंतर मला राज्यपाल करून आंध्र प्रदेशमध्ये पाठवले

सोलापुरात महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळातर्फे भारत गौरव पुरस्कार शिंदे यांना देण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना शिंदे यांनी म्हटले की, मुख्यमंत्री असताना गुजराती समाजाला 2 टक्के आरक्षण दिले होते. तेवढे एक चांगले काम मी केले होते. लोक आता विसरून गेले की सुशीलकुमारांनी ते चांगले काम केले. गुजराती समाजाला आरक्षण दिले कारण माझा जावईही गुजराती असल्यामुळे मला ते करावे लागले अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली.

Related posts